‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या अत्यंत रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिली तसंच या दुसऱ्या भागावरही प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलंही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडणारी यातीलच एक भूमिका म्हणजे ‘वच्छी’. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी साकारते.
संजीवनीला या मालिकेची ऑफर कशी मिळाली आणि तिचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लहानपणापासूनच संजीवनीला अभिनयाची आवड होती. अभिनयासाठी घरातून कधीच साथ मिळाली नसली तरी ‘वच्छी’पर्यंतचा तिने हा प्रवास कसा गाठला याबद्दल तिने सांगितले. या मुलाखतीत तिने लहानपणीचे काही किस्सेसुद्धा सांगितले आहेत.
पाहा मुलाखत..
वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्स देखील तितकाच लोकप्रिय होत आहे. स्वतःच्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. या डान्सविषयी तिने काही गमतीशीर गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी या मुलाखतीचा पुढचा भाग नक्की पाहा.