छोट्या पडद्यावरील थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे हे ३रे पर्व सुरु आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपूर्वाला तिचे चेक मिळत नव्हते आणि त्यामुळे तिचं आर्थिक नुकसान होत असल्याचं तिने सोशल मीडिया पोस्ट करतं सांगितलं आहे.
अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. “प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे ५ ते ६ दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु ५ ते ६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे”, असे अपूर्वा म्हणाली.
पुढे अपूर्वा तिच्यासोबत आधी सुद्धा एकदा असं झालं असं सांगत म्हणाली, “असाच प्रकार गेल्यावर्षी ‘झी युवा’वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही,असं आश्वासन दिले गेले होतं. अद्याप पर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासनसुद्धा पाळलं गेलं नाही.”
आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण
तिच्या कष्टाचा मोबदला मिळत नसल्याचं म्हणतं अपूर्वा म्हणाली, “मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला.”
आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का
शेवतां ही भूमिका साकारणार नाही असं सांगत अपूर्वा म्हणाली, “या पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहिन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.”