बुधवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘आरआरआर’चे संगीतकार एमएम कीरावानी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तबलावादक झाकीर हुसेन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. हुसैन यांना यापूर्वी १९९८ मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या भावना व्यक्त केल्या. “मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. माझे योगदान, माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान देता आले, त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची ऋणी आहे,” असं रवीना म्हणाली.

रवीना टंडनने, १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ‘अंदाज अपना अपना’, ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘खिलाडियों के खिलाडी’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०२२ साली आलेल्या ‘KGF: Chapter 2’ मध्ये सहाय्यक भूमिका केली होती. तसेच क्राइम थ्रिलर मालिका ‘अरण्यक’मधून तिने ओटीटी पदार्पणही केले होते.

‘पठाण’ने रचला इतिहास! चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; देशभरात ‘इतके’ शो वाढवले

३० वर्षांहून अधिक काळ संगीत विश्वात योगदान देणारे एमएम कीरावानी यांना ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब देण्यात आला होता. या गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. त्यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Story img Loader