बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) अलीकडेच KGF 2 मध्ये दिसली होती. या चित्रपटात रवीनाने रमिका सेन ही भूमिका साकारली होती. रवीनाच्या अभिनयाची चाहते स्तुती करत आहेत. रवीनाने १९९१ मध्ये पत्थर के फूल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. रवीना आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. पण तिचा बॉलिवूडमधील प्रवास इतका सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवीनाने तिच्या चित्रपटसृष्टीतील संघर्षाबद्दल सांगितले आहे.
रवीना नुकतीच ‘मिड डे’ला मुलाखत दिली. यावेळी तिच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाली, “चित्रपटात येण्यापूर्वी ती एका स्टुडिओमध्ये काम करायची आणि तिथे मी फरशी आणि उलटी साफ करण्याचंही काम केलंय. हो, हे खरं आहे. ज्या स्टुडिओत मी लोकांनी केलेली घाण साफ करायचे. मी दहावीपासून प्रल्हाद कक्कर यांना असिस्ट करायला सुरुवात केली.”
आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!
आणखी वाचा : मोराचे पिस : घरातील संकटे दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यास ठरू शकते उपयुक्त
रवीना पुढे म्हणाली, “त्यावेळीही लोक मला म्हणायचे की तू पडद्यामागे काय करत आहेस? तू तर पडद्यावर दिसली पाहिजेसआणि मी म्हणायचे नाही, मी आणि अभिनेत्री नाही? मी अभिनेत्री होईन असा कधीच विचार केला नव्हता.”
आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या रवीनाने पुढे सांगितले की, “जेव्हा पण प्रल्हाद यांच्या सेटवर मॉडेल नसायच्या, तेव्हा ते म्हणायचे रवीनाला बोलवा. ते मला माझा मेकअप करायला सांगायचे आणि मग मी फोटोसाठी पोज देऊ लागले. मग मला वाटले की हे सगळं मला करायचं आहे तर मग प्रल्हादसाठी मी हे फुकटात का करू? मी त्यातून काही पैसे कमवू शकते? अशा प्रकारे मी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी कधीही अभिनय, डान्स किंवा डायलॉग कसे बोलण्याचे याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. मला वाटते की मी हळूहळू हे सर्व शिकले.”
आणखी वाचा : अक्षय कुमारला दिला मिलिंद सोमणने पाठिंबा, म्हणाला…
दरम्यान, रवीना ‘KGF 2’ मध्य अभिनेता यश आणि संजय दत्तसोबत दिसली होती. आता ती पुन्हा एकदा संजय दत्तसोबत ‘घुडचढी’ या चित्रपटात दिसणार आहे. बिनॉय गांधी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.