गेल्या काही दिवसांपासून ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर बाहुबली फेम प्रभासने हे ट्वीट केले होते. तर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनही यावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रवीनाने ही पोस्ट मराठीत केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. रवीनाने सरसेनापती हंबीररावचा टीझर ट्वीट करत शेअर केला. हा टीझर शेअर करत “प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा”, असे कॅप्शन रवीनाने दिले आहे. रवीनाने मराठीत ट्वीट करत मराठी चित्रपटसृष्टीला दिलेला पाठिंबा पाहत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.

aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असा चारही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ‘मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार’, असं तरडे या चित्रपटाविषयी म्हणाले होते. तर खरचं या चित्रपटाच्या भव्यतेची झलक या टीझरमध्ये पहायला मिळते.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची प्रविण तरडे यांनी घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याआधी प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं होतं.

Story img Loader