शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीबाबत गुरुवारी सुनावणी झाली. मुंबई न्यायालयाने आर्यन खानसह ८ जणांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने म्हटले आहे की एनसीबीला तपासासाठी पुरेपूर संधी आणि वेळ देण्यात आली आहे, त्यामुळे आता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जात आहे. दरम्यान, अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत आर्यन खानला पाठिंबा दिला. अभिनेत्री रवीना टंडनने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रवीनाने आर्यन खानला पाठिंबा देत ट्वीट केले आहे. ‘लाजिरवाणे राजकारण केले जात आहे. हे एका तरुणाचे आयुष्य आहे आणि तुम्ही त्याच्या भविष्यासोबत खेळत आहात. हे भयानक आहे’ या आशयाचे ट्वीट रवीनाने केले आहे.

आणखी वाचा : ‘सगळे माफिया पप्पू…’, हृतिकने आर्यन खानला पाठिंबा देताच कंगनाने केली पोस्ट

यापूर्वी हृतिक रोशनने देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिला होता. ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो’ असे म्हणत ऋतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.