लवकरचं रविना टंडनची पोस्ट बदलणार आहे…. नाही कळलं ना.. बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री आता सासू होणार आहे. रविनाने दत्तक घेतलेल्या मुलींपैकी एक असलेली तिची मुलगी छाया गोव्यात २५ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे.
रविनाने ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली. तिने म्हटले की, या आठवड्यात पूर्ण हल्ला गुल्ला होणार आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी गोव्याला जात आहे.
Off to goa for my younger ones wedding…going to be a hulla gulla week…. 🎂🎂🍰🍰🍷🍷🍷💃🏻💃🏻!
— Raveena Tandon (@TandonRaveena) January 21, 2016
And time really flies….it’s time to walk her down the aisle….❤️ pic.twitter.com/QO9jGGyZpg — Raveena Tandon (@TandonRaveena) January 21, 2016
रविनाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू-ख्रिश्चन पद्धतीने गोव्यात विवाहसोहळा पार पडेल. ९०च्या दशकात गाजलेल्या या अभिनेत्रीने त्यावेळी दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यापैकी मोठी मुलगी पूजा हिने २०११ साली विवाह केला. रविनाने चित्रपट वितरक अनिल थंदानी याच्याशी विवाह केला असून त्यांना मुलगी राशा आणि मुलगा रणबीर ही दोन मुले आहेत.