Ravi Kishan On Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी काल १३ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद पोलिसांनी अटक केली. चेंगराचेंगरीच्या एका घटनेत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला त्याच्या निवासस्थानातून अटक करून पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले. त्याच्या अटकेमुळे चाहत्यांमध्ये संताप उसळला होता. चित्रपटसृष्टीतील त्याचे सहकारी व राजकीय नेतेही त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. रश्मिका मंदाना, अभिनेता नानी, विवेक ओबेरॉय, वरुण धवन आणि राजकीय नेते जगन मोहन रेड्डी यांनी त्याच्या अटकेवर भाष्य केले आहे.

हेही वाचा…अभिनयातील ब्रेकचा उल्लेख असणाऱ्या ‘त्या’ पोस्टवर विक्रांत मॅसीने दिले स्पष्टीकरण म्हणाला, “सोशल मीडियाचा दबाव…”

अभिनेता व राजकारणात सक्रिय असलेले रवी किशन यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “ही घटना आणि हा दिवस संपूर्ण अभिनय क्षेत्रासाठी, चित्रपटसृष्टीसाठी आणि अल्लू अर्जुनच्या जगातील चाहत्यांसाठी ‘काळी घटना’ (काळा दिवस) आहे. अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता असून त्याने चित्रपट व्यवसायासाठी मोठे योगदान दिले आहे. तो एक चांगला नागरिक असून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि प्रशासनाने अल्लू अर्जुनला अशी वागणूक का दिली यावर उत्तर द्यायला हवे.”

पुढे रवी किशन म्हणाले, मी अल्लू अर्जुनला वैयक्तिकरित्या ओळखतो. तो खूप चांगला माणूस आहे, तरी त्याला तो जणू कोणी दहशतवादी आहे अशी वागणूक देण्यात आली. अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून खेचून बाहेर आणण्यात आले. याचा त्याच्या मुलांवर काय परिणाम झाला असेल? खरंच हा खूप वाईट दिवस होता.” रवी किशन यांनी २०१४ साली आलेल्या ‘रेसर गुर्रम’ (लकी द रेसर) या चित्रपटात अल्लू अर्जुनसह काम केले आहे.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या अटकेवेळी त्याचे वडील व प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद, भाऊ अल्लू सिरीश आणि इतर कुटुंबीय त्याच्या अटकेवेळी उपस्थित होते. अटकप्रक्रियेदरम्यान पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या बेडरूममध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.

अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ च्या विशेष शोला हैदराबाद येथील संध्या थिएटरला गेला होता. येथे त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. याबाबत प्रतिक्रिया देताना अल्लू अर्जुन म्हणाला, “या घटनेमुळे मला खूप वाईट वाटले आहे.” त्याने पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि जखमी मुलाच्या उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा…Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाला रेखा यांनी मारली मिठी, आपुलकीने अगस्त्य नंदाच्या चेहऱ्यावरून फिरवला हात; पाहा व्हिडीओ

‘पुष्पा २’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि माफी मागितली. त्यांनी सांगितले, “माझं मन तुटलं आहे, मी त्या कुटुंबाची माफी मागतो आणि त्यांना आम्ही कायम मदत करू, याची हमी देतो.”

हेही वाचा…कैदी क्रमांक ७६९७, रात्रभर फरशीवर झोपला अन्…; अल्लू अर्जुनने तुरुंगात ‘अशी’ घालवली रात्र

अटकेनंतर गर्दी व्यवस्थापनाच्या अपयशावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी यासाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले असून, अल्लू अर्जुनवर आरोप करण्याऐवजी प्रशासनाने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi kishan reaction on allu arjun arrest in hyderabad stampede case psg