गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार व अभिनेते रवी किशन आपल्या मुलीचे वडील असल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी एका महिलेने केला होता. १९९६ मध्ये आपलं रवी यांच्याशी लग्न झाल्याचं या महिलेने म्हटलं होतं. या महिलेवर लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्ला यांच्या तक्रारीवरून आरोप करणारी महिला अपर्णा सोनी उर्फ ​​अपर्णा ठाकूर, तिची मुलगी, मुलगा आणि पती तसेच समाजवादी पक्षाचे नेते विवेक पांडे यांच्यासह सहा जणांविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी किशन यांची पत्नी असल्याचा दावा करणारी महिला काय म्हणाली होती?

अपर्णा ठाकूरने दावा केला होता की १९९६ मध्ये तिने कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत रवी किशन यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी असून ते आता आपल्या सर्वांसमोर स्वीकारत नसल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत या महिलेबरोबर एक मुलगीही होती. रवी किशन आपल्या संपर्कात आहे, पण ते सार्वजनिकरित्या आपल्याला स्वीकारत नाही व मुलीशी ओळख दाखवत नाही, आपल्या मुलीला रवी किशन यांची मुलगी असण्याचे सर्व अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी या महिलेने केली होती.

रवी किशन यांच्या पत्नीने दिली तक्रार

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्लाने, अपर्णा सोनी उर्फ ​​अपर्णा ठाकूर, तिचा पती राजेश सोनी, मुलगी शिनोवा सोनी, मुलगा सौनक सोनी, समाजवादी पक्षाचे नेते विवेक कुमार पांडे यांच्यासह आणखी एका जणाविरोधात लखनऊमधील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा एफआयआर आयपीसीच्या कलम १२०बी/१९५/३८६/३८८/५०४ आणि ५०६ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

Video: “मी रवी किशन यांची पत्नी आहे”, महिलेच्या दाव्याने खळबळ; मुलीला जाहीरपणे स्वीकारण्याची केली मागणी

महिलेने खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली – प्रीती शुक्ला

प्रीती शुक्लांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की मुंबई राहणाऱ्या या अपर्णा ठाकुरने अंडरवर्ल्डचा उल्लेख करत धमकी दिली आहे. जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर बलात्कार केल्याच्या खोट्या आरोपात तुझ्या पतीला अडकवेन, असं तिने म्हटलंय. इतकंच नाही तर तिने २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही प्रीती यांनी केलाय. याप्रकरणी मुंबईत तक्रार देण्यात आली आहे. तरीही या महिलेने १५ एप्रिलला पत्रकार परिषद घेत लखनऊमध्ये रवी किशन यांची पत्नी असल्याचा दावा करत खोटे आरोप केले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

एफआयआरमध्ये काय म्हटलंय?

अपर्णा ठाकुर विवाहित असून तिचा पती राजेश सोनीचं वय ५८ वर्ष आहे. शिनोव्हाचं वय २७ आहे आणि त्यांना सोनिक नावाचा २५ वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणात हे सर्वजण सहभागी आहेत. त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टीचे विवेक कुमार पांडे व एका यूट्यूब चॅनलचे पत्रकार खुर्शीद खान राजूही सहभागी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप करून रवी किशन यांची प्रतिमा मलीन करण्याचा व त्यांना बदनाम करण्याचा हेतू आहे, असं प्रीती शुक्ला यांनी एफआयआरमध्ये म्हटलंय.

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

महिलेने फेटाळले प्रीती शुक्लांचे आरोप

आज तकने यासंदर्भात अपर्णा ठाकुरशी संपर्क केला. तर तिने प्रीती शुक्लांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. एफआयआरबद्दल माहिती मिळाली असून ती यासंदर्भात वकिलांशी बोलत आहे, असं तिने म्हटलं. आपण १० महिन्यांपूर्वी रवी किशन यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती, पण त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही, असंही तिने सांगितलं. आपण २० कोटी रुपये खंडणी म्हणून नाही तर मुलीचे शिक्षण, लग्न व भविष्यासाठी मागितल्याचा दावा तिने केला आहे. “मी अंडरवर्ल्डचा उल्लेख केलेला नाही. हे लोक सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांचा असू शकतो. ते मला व माझ्या मुलीला त्रास देत आहेत. तक्रारीत माझ्या मुलाचं नाव आहे पण तो चार वर्षांपासून भारतात राहत नाही, माझे पतीही इथे राहत नाही, माझ्या वकिलांनाही आरोपी ठरवण्यात आलं आहे,” असं या महिलेने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi kishan wife preeti shukla files complaint against woman aparna thakur who claimed to be wife of actor hrc