दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेकजण पुष्पाचे रिल्स तयार करुन सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, क्रिकेटर रवींद्र जडेजाने सुद्धा अल्लू अर्जुनच्या भूमिकेचे रिक्रिएशन केले आहे. ते पाहून अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया देखील दिली आहे.
रवींद्र जडेजाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने स्वत:चा पुष्पाच्या लूकमधील देखील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने तेलुगूमध्ये ‘पुष्पाचा अर्थ तुम्ही फूल असं समजलात का? इथे त्याचा अर्थ आग असा आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी रुपये मानधन? ऐकून बसेल धक्का
Video: ‘पुष्पा’ चित्रपटातून हटवण्यात आलेला ‘तो’ सीन झाला प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
जडेजाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अल्लू अर्जुनने देखील जडेजाच्या या फोटोवर तेलुगूमध्ये कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनने त्यासोबतच आगीचे इमोजी वापरले आहेत.
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.