समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या जॉन अब्राहमच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’ म्हणजे ‘रॉ’ चित्रपटाची बक्कळ कमाई सुरु आहे. ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ वर आधारीत चित्रपट आहे. जॉनने या चित्रपटात भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जो पाकिस्तानात स्वत:ची मूळ ओळख लपवून भारताच्या सुरक्षेसंदर्भात माहिती गोळा करण्याच्या मिशनवर असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल नकारात्मक मत नोंदवले होते. हा चित्रपट ‘राजी’ ची कॉपी असल्याचे मत अनेकांनी नोंदवले होते. पण १९७१ युद्धाच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ते या चित्रपटाच्या कमाईवरुन स्पष्ट होते.

जॉन आणि रॉ चीफ म्हणून जॅकी श्रॉफ यांनी आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. हा रॉ चित्रपटाचा दुसरा आठवडा असून या चित्रपटाने आतापर्यंत ४१ कोटींची कमाई केली आहे. या आठवडयातही फारसे आवाहन नसल्यामुळे रॉ च्या कमाईचा आकडा आणखी वाढणारच आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raw box office collection