अश्वत्थामा या पात्राला महाभारतात नराधम असे म्हटले गेले आहे. कारण त्याने ब्रह्मास्त्र चालवले आणि ते मागे घेणे त्याला ठाऊक नव्हते म्हणून त्याने ते उत्तरेच्या गर्भावर चालवले. एवढेच नाही तर पाच पांडव समजून पाच पांडवांच्या मुलांची हत्या त्याने एका रात्रीत केली. त्याच्या या कृत्यांमुळेच श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावरचा नीलमणी कापून घेतला आणि त्याला शाप दिला की तू कपाळावरच्या जखमेसाठी तेल मागत फिरशील पण तुला कोणीही तेल देणार नाही.अश्वत्थामा अमर झाला, त्याला मुक्ती नाही आहे ती फक्त जखम.. वेदना.. अनंत काळासाठी.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

अगदी अश्वत्थाम्यासारखा नसेल पण वेदनेचा एक धागा आपल्याही मनात असतो. त्याचाच आधार घेत अनुराग कश्यप या गुणी दिग्दर्शकाने आपल्या भेटीला आणलेल्या फिल्म वेब सीरिजचे नाव आहे Sacred Games. यातली गणेश गायतोंडे, सरताज सिंग, मालकम, कूक्कू, कांताबाई, बंटी, अंजली माथूर, पारूळकर, भोसले ही सगळी कॅरेक्टर्स आपल्या मनाचा ठाव घेतात. ती आपल्या आसपास वावरत आहेत असे वाटावे इतकी ती जिवंत करण्यात अनुरागला यश आले आहे. उत्कंठावर्धक सुरूवात, भूतकाळ आणि वर्तमान काळ हातात हात घालून होणारे सीन आपल्या मनाची पकड घेतात आणि पहिल्या भागापासून पुढचे आठही भाग ही वेब सीरिज आपल्या मनाचा अलगद ताबा घेते. या वेबसीरिजचा दुसरा पार्ट लवकरात लवकर यावा यासाठी सध्या ट्विटर आणि सोशल मीडियावर जोरदार मागणी होते आहे.

२५ दिवसात सगळे काही संपणार फक्त त्रिवेदी वाचणार असा दावा यातल्या गणेश गायतोंडेने अर्थात (नवाजुद्दीन सिद्दीकी) केला आहे. त्याचे रहस्य दुसऱ्या भागातच उलगणार आहे. मात्र पहिले ८ भाग तोडीस तोड आहेत. पहिल्या भागाच्या सुरूवातीपासून शेवटच्या भागाच्या शेवटापर्यंत आपल्याला पडणारे प्रश्न आणि त्याची मिळत जाणारी उत्तरे याचा गोफ अनुराग कश्यपने ज्या प्रकारे विणला आहे त्याला जवाब नाही. चक्रव्युहात सापडल्यावर माणूस ज्या प्रमाणे रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो अगदी तसाच प्रयत्न भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा मिलाफ साधत यामध्ये करण्यात आला आहे.

विक्रम चंदा यांच्या Sacred Games या कादंबरीवरच ही फिल्म वेबसीरिज बेतलेली आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप या दोन गुणी दिग्दर्शकांनी या वेब फिल्म सीरिजला खास तडका दिला आहे तो त्यांच्या अफाट दिग्दर्शनाचा. त्याशिवाय या सीरिजची ताकद आहे ती म्हणजे त्यातले सशक्त डायलॉग्ज.

‘बिच्छू है अपनी कहाँनी साहाब, चिपक गयी हैं आपको’, ‘कभी कभी ऐसा लगता हैं मैंही भगवान हूँ’, ‘गद्दार को मारने का तो मारने का, अगर बंटी नहीं होता तो हिंदू मुसलमान की लडाईं शुरूही ना होती, उसके जिस्ममें खून नहीं था जहर था जहर, खास कर मुसलमानोंके लिये‘, ‘मै कोई भी है लेकिन तेरा अपना नहीं है’, ‘हिंदुस्थान जब हिंदुस्थान नहीं था तबसे पॉलिटिक्सकी मछली को धर्म के तेलमें फ्राय करते आ रहें है!’, ‘मैने तुझे अपना भाई समझा और तुने बिभीषण बनके मुझे रावण बना दिया’, ‘मै जहाँभी हूँ सर अपना काम कर रहाँ हूँ आपभी कर लिजीए.. जनम सुधर जाएगा’ ‘सुभद्रा निर्दोष थी उसकी मौतने मेरे अंदरके हिंदू को जगा दिया’, ‘सुभद्रा का बदला लेनेके लिये मैने एक रातमें ८० मुसलमानोंका खून किया, मगर वो वापस नहीं आयी.. मुझे मालूम था ८०० को मारता तो भी वापस नहीं आती’ अशा कितीतरी संवादांची यादी करता येईल.

शिव्यांचा आणि सेक्स सीन्सचा वापरही तुफान करण्यात आला आहे. मात्र कोणताही सीन किंवा शिवी आपल्याला खटकत नाही. उलट हीच शिवी इथे असली पाहिजे असे वाटते.  यातला अश्वत्थामा आहे गणेश गायतोंडे, अर्थात नवाजुद्दीन आणि अभिमन्यू आहे सैफ अली खान अर्थात सरताज सिंग. अभिनयाचा कस तर सगळ्यांचाच लागला आहे. मात्र दाद द्यावी लागेल ती नवाजुद्दीन आणि सैफ अली खान या दोघांची.

नवाजुद्दीनच्या अभिनयाची झलक आपण गँग्ज ऑफ वासेपूर, कहानी, तलाश यांसारख्या सिनेमांतून पाहिलीच आहे. त्याने साकारलेला रमन राघवही लाजवाब होता. मात्र या वेब सीरिजमधला गणेश गायतोंडे हा त्याच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरणार आहे यात काहीही शंका नाही. भेदक नजरेने आणि निर्विकार चेहेऱ्याने तो ज्या प्रकारे सूड घेतो ते सीन्स अप्रतिम. जी बाब नवाजची तीच सैफचीही. एक सरदार पोलीस अधिकारी त्याने ज्या ताकदीने साकारला आहे त्याला जवाब नाही. ओमकारात त्याने लंगडा त्यागी साकारला होता. त्यानंतर लव्ह आजकलमध्ये सरदार साकारला. मात्र यातला पोलीस अधिकारी लक्षात राहणारा आहे. सैफ अली खानला या भूमिकेत आपला सूर अगदी परफेक्ट सापडला आहे. अपयशी असणं, प्रामाणिक असणं, शोध लावण्याची उर्मी असणं हे त्याने ज्या पद्धतीने साकारले आहे त्यावरून त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचाही विचार आपल्याला सरताज सिंग म्हणून करता येत नाही.

ही वेबसीरिज ज्या ठिकाणाहून संपली आहे त्याने उत्कंठा वाढली आहे. सुरूवातीच्या फ्रेमपासून उलगडत जाणारा हा प्रवास आता कुठे जाऊन संपणार? २५ व्या दिवसापासून सुरू झालेला हा प्रवास ११ दिवसांपर्यंत आलेला आहे. तरीही आणखी रहस्यांची उकल व्हायची आहे. ती रहस्ये कशी उलगडणार? या प्रश्नांची उत्तरे पुढच्या साधारण ४ ते ५ भागांमध्ये मिळतील. मात्र आत्तापर्यंत आलेले ८ भाग रसिकांसाठी मनोरंजनाची आणि बुद्धीभेदाची मेजवानी ठरले आहेत त्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे अप्रतिम कॅमेरा वर्क आणि त्याही पेक्षा अफलातून दिग्दर्शन.

अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे ज्याने या वेब सीरिजमध्ये कमाल केली आहे. राम गोपाल वर्माच्या पट्टशिष्यांमध्ये दोन नावे घेता येतील. एक म्हणजे अनुराग कश्यप आणि दुसरा शीमीत अमीन. त्यातही अनुरागला पहिला क्रमांक. सत्या या सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर असलेल्या अनुराग कश्यपने रामू कँपमधून बाहेर पडत आपली वेगळी ओळख बनवली. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘पाँच’, ‘गुलाल’, ‘देव डी’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर पार्ट १ आणि पार्ट २’, ‘रमन राघव २.०’, ‘अग्ली’ अशी किती तरी सिनेमांची नावे घेता येतील. देशी मातीतला गॉडफादर काय असतो ते आपल्याला गँग्ज ऑफ वासेपूरमधून बघायला मिळाले. आता अशा हुशार आणि सिनेमा या माध्यमावरची पकड असलेल्या दिग्दर्शकाने विक्रमादित्य मोटवानीच्या साथीने सेक्रेड गेम्स साकारली ही वेब सीरिज साकारली आहे. येत्या भागांमधून अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेतच. मात्र तूर्तास तरी Sacred Games ही कलियुगातल्या अस्वस्थ अश्वत्थाम्याची कहाणी आहे हे नक्की.

— समीर चंद्रकांत जावळे

Story img Loader