या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या सगळीकडे मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसपासून बस थांब्यांपर्यंत आणि रस्त्यावरच्या होर्डिग्जवरही ‘नच बलिए’चे मोठमोठे पोस्टर्स झळकले आहेत. सेलिब्रिटी कलाकारांचे चेहरे या स्पर्धेत झळकत असल्याने आपल्यालाही या शोची उत्सुकता वाटली नाही तरच नवल! टेलीव्हिजनवर आता नृत्याधारित रिअ‍ॅलिटी शोजचे जे पेव फु टले आहे त्यात सर्वसाधारणपणे सेलिब्रिटी डान्स शोजना जास्त मागणी असते, लोकप्रियता मिळते हेही आपण अनुभवलं आहे. ‘झलक दिखला जा’ संपलं आहे आणि आता ‘नच बलिए’च्या आठव्या पर्वाची धामधूम सुरू असताना या शोजची लोकप्रियता आणि त्यांचे वास्तव यांचा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न.

साधारणत: नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांची विभागणी दोन प्रकारात करता येईल. एक म्हणजे सामान्य लोकांमधून नृत्याची असामान्य प्रतिभा निवडण्यासाठी केले जाणारे डान्स रिअ‍ॅलिटी शो आणि दुसरे म्हणजे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंत म्हणजेच ‘सेलिब्रिटी’ यांना स्पर्धक म्हणून सहभागी करून केले जाणारे ‘डान्स रिअ‍ॅलिटी शो’. या दोन्ही वरून प्रकारांचा हेतू वाहिनीचा टीआरपी रेट वाढवणे असला तरी लोकप्रियतेचा उच्चांक सध्या ‘सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शो’ला मिळत असल्याने हा प्रकार वर्षांगणिक वाढत चालला आहे. बहुतांश वाहिन्या याच सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शोचे प्रसारण करण्यास पसंती देतात. सामान्य लोकांमधून निवडून त्यांना स्पर्धक म्हणून घेऊन त्यांच्यावर आधारित डान्स रिअ‍ॅलिटी शो प्रसारित करण्याचे प्रमाण त्यामानाने कमी आहे. किंबहुना, असे शो हे नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझासारख्यांनी मनावर घेतल्यामुळे थोडय़ा फार प्रमाणात खरे नृत्याधारित आणि नर्तकांची कसोटी पाहणारे शो सुरू आहेत.

मराठीत वाहिन्यांमध्ये पाहावयाचे झाल्यास ‘एका पेक्षा एक’ची पहिली दोन सत्रे, त्यानंतर िहदीतल्या ‘डान्स इंडिया डान्स’ या संकल्पनेवर आधारलेला ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ आणि सध्या सुरू असलेला ‘मॅड’ असे काही हातावर मोजण्याएवढेच कार्यक्रम हे सामान्य नृत्य प्रतिभावंतांना प्रसिद्धीस आणण्यासाठी केले गेले. मी मुद्दामहून ‘प्रसिद्धीस आणणे’ हा शब्दप्रयोग येथे केला आहे कारण बऱ्याचदा या नृत्यविषयक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे सामान्य स्पर्धक हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच येथे सहभागी होत असतात. िहदीमध्येही ‘डान्स इंडिया डान्स’ वगळता या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांची वानवाच होती व अजूनही आहे. भारतामध्ये नृत्यविषयक डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बुगी वुगी’ या कार्यक्रमाची संकल्पना ही सामान्य नृत्य प्रतिभा नावारूपास आणणे हीच होती. याउलट सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शो हे विश्व अत्यंत निराळे असून केवळ वाहिनीचा टीआरपी वाढावा म्हणून निर्मात्यांनी अशा कार्यक्रमांचा घाट घातलेला असतो. यामधले एकूणच गणित निराळे असते.

एकतर या शोजमध्ये सहभागी होणाऱ्या कलावंतांना मानधन दिले जाते, शिवाय त्यांच्यासाठी वैयक्तिक नृत्यदिग्दर्शकांची नियुक्ती केलेली असते. या सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकलरीत्या सहभागी असणे अथवा आपल्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबत सहभागी होणे. दोन्ही प्रकारांमध्ये प्रसिद्धी तेवढीच पण मेहनत मात्र वेगवेवेगळी असते. अशा सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये खऱ्या अर्थाने कसोटी असते ती म्हणजे नृत्यदिग्दर्शकांची. ‘झलक दिखला जा’सारख्या शोमध्ये कलावंत स्पर्धक एकलरीत्या सहभागी होत असल्याने नृत्यदिग्दर्शकच त्याला जोडीदार म्हणून साथ देतो. प्रसंगी नृत्यदिग्दर्शकाला दोन्ही अंगाने स्वत:ची प्रसिद्धी करून घेता येते. एक म्हणजे तो स्वतच्या अंगी असलेले नृत्यकौशल्य आणि नृत्य बसवण्याचे कौशल्य असे दोन्ही गुण दाखवतो. शिवाय सोबत असणाऱ्या कलावंत जोडीदाराचे नृत्यामधील अवगुणही तो नृत्यसादरीकरणादरम्यान लपवू शकतो. तसेच कलावंत एकलरीत्या सहभागी होणाऱ्या नृत्यविषयक कार्यक्रमांच्या सुरुवातीच्या काळात ज्या कलाकारांना नृत्यातील बाराखडीही माहिती नाही अशा कलावंतांना सहभागी करून घेतले जायचे, त्यावेळेस नृत्यदिग्दर्शकांची परीक्षा असायची. त्यामुळे स्पर्धक कलावंत योग्य रीतीने नाचला तर त्याचे संपूर्ण श्रेय हे नृत्यदिग्दर्शकाला जात होते. मात्र त्यांनतर नृत्यात निपुण असणाऱ्या कलावंतांना सहभागी करून घेण्याची पद्धत सुरू झाली त्यामुळे नृत्यदिग्दर्शकाचे महत्त्व कमी झाले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महेश मांजरेकर, मोना कपूर, अजय जाडेजा, कपिल देव अशा नृत्याविषयी ज्ञान नसणाऱ्या कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले होते, मात्र त्यानंतरच्या पुढल्या सत्रात सुरुवातीपासून नृत्यनिपुण असणाऱ्या शक्ती मोहन, श्व्ोता तिवारी, श्रीसंत या कलावंतांना सहभागी करून घेण्यात आल्याने अर्थातच चित्र बदलले.

खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबत नृत्य सादरीकरण करण्याचा निराळा प्रकार ‘नच बलिए’ या कार्यक्रमाने नृत्यविषयक कार्यक्रमांमध्ये आणला. खऱ्या आयुष्यातील जोडीदार नृत्यात निपुण नसला तरी त्याच्यासोबत नृत्य सादर करणारे आपले आवडते कलाकार लोकांना पाहणे आवडू लागले. पण यामध्ये नृत्यदिग्दर्शकाचे महत्त्व एक पायरी मागे गेले. कलावंत स्पर्धकांबरोबर जोडीदार म्हणून साथ देताना नृत्यदिग्दर्शकांचे कौशल्य दिसते मात्र जोडीसाठी काम करताना नृत्यदिग्दर्शक हा पडद्याच्या मागे असतो. शिवाय अशा वेळेस त्याला दोघांवर मेहनत घ्यायची असते. या शोजमुळे नृत्यदिग्दर्शकांचा आíथक प्रश्न सुटत असला तरी त्यांचा कामाचा त्याहीपेक्षा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न मात्र कायम राहतो. सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करणारे नृत्यदिग्दर्शक हे अनुभवी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक नसतात. काही वेळा एखाद्या नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमधून प्रसिद्ध झालेले स्पर्धकच अनेकदा अशा सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये नृत्यदिग्दर्शकांचं काम करत असतात. त्यामुळे अनेकदा अशा कार्यक्रमातून आपली ओळख निर्माण करणे हा त्यांचा हेतू असतो. पण, बऱ्याचदा तो साध्य होत नाही कारण या शोजमधून अनेकदा स्पर्धक कलावंतांना मोठे केले जाते. त्यांना घडवणाऱ्या नृत्यदिग्दर्शकाला नाही असे आपल्या लक्षात येईल. शिवाय बऱ्याचदा नामांकित नृत्यदिग्दर्शकांचे साहाय्यक नृत्यदिग्दर्शक सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांचे नृत्यदिग्दर्शक असतात. तरीही अनेकदा भविष्यात त्यांचे काही भले झालेले पाहावयास मिळत नाही. त्यामुळे हा सगळा सोस, आर्थिक उलाढाल ही वाहिन्यांचा टीआरपी आणि त्यांचे आर्थिक गणित वजनदार करण्यासाठीच असते हे लक्षात येते. वरवर दिसणाऱ्या या भपकेबाज प्रकारात रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक कलावंत यांना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी मिळतात. वाहिनीलाही त्यांची आर्थिक उलाढाल साधता येते. मात्र ज्यांच्यासाठी हा शो असायला हवा त्यांचे चेहरे कायम पडद्याआडच राहतात, ही खेदाची गोष्ट आहे. नृत्यदिग्दर्शकांची एक नवी पिढी प्राधान्याने या शोमधून घडायला हवी, मात्र हे आजही एक न पूर्ण करता येण्याजोगे स्वप्न उरले आहे!