बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या सेटवर भेट दिली.
अभिषेक बच्चननेही आपल्या वडिलांनी फराह खानच्या सेटवर भेट दिल्याचे ट्विट केले आहे.
त्यानंतर त्याने ट्विट केले की,
बच्चन पिता-पुत्रांच्या या टिवट्समुळे अभिषेक आणि ऐश्वर्या हे बच्चन कुटुंबियांपासून वेगळे राहत असल्याची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे समजते. तसेच, हे संपूर्ण कुटुंब सुखासुखी एकाच छताखाली राहत आहे.
अभिषेक बच्चन ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात काम करत असून, शाहरूख, दीपिका, सोनू सूद, बूमन इराणी, विवान शाह यांच्याही भूमिका आहेत. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन ‘भूतनाथ रिटर्न’मध्ये दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा