बॉलीवूड दिवा करिना कपूर तिच्या अभिनयासाठी आणि स्टाईलसाठी नेहमीच नावाजली जाते. पण, करिनाने ‘सत्याग्रह’ चित्रपटात अजय देवगणसोबत ‘किसींग सीन’ करण्यास नकार दिला. चित्रपटातील ‘रससे भरे तोरे नैना सावरिया’ या प्रणयरम्य गाण्यात करिनाने अजयला किस करायचे होते. मात्र, सैफशी लग्न झाल्यानंतर करिनाने असे कोणतेही दृश्य चित्रीत करण्यास नकार दिला आहे.
लग्नापूर्वी करिनाने विशाल भारद्वाजच्या ‘ओमकारा’ चित्रपटात अजसोबत प्रणयदृश्य चित्रीत केली होती. तसेच, तिने आमिरसोबत ‘३ इडियट्स’मध्येही किसींग सीन दिला होता. हिरोइन चित्रपटात तिने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. पण, आता तिने इतर सहकलाकार तसेच सैफसोबतही पडद्यावर प्रणयदृश्य साकारण्यास नकार दिला आहे. पतौडी घराण्याची सून असलेल्या करिनाला तिच्या सासूबाईंना (शर्मिला टागोर) वाईट वाटेल असे कोणतेही दृश्य चित्रीत करायचे नाही आहे, असे ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या सेटवरील सूत्राने सांगितले आहे.
सैफसोबत लग्न झाल्यानंतर करिनाने तिच्या कामात बदल आणला आहे. ती बहुतेक आता कोणत्याही चित्रपटात प्रणयदृश्य साकारताना दिसेल का? हा एक प्रश्नच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा