‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाने धमाल उडवून देणारी टीम या चित्रपटाच्या सिक्वलने आज पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. आज ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तुम्ही का पाहाल याची कारणे-

क्वीन कंगना- अर्थातच, कंगना रणावत हे मुख्य कारण आहे. ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘फॅशन’ या चित्रपटांमधून कंगनाने आपल्या अभिनयाची भुरळ पाडली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना या चित्रपटात दोन विविध भूमिकांमध्ये चित्रपटात पाहावयास मिळेल. त्यामुळे निदान कंगनाच्या अभिनयाने तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील.

विनोदी तडका- चित्रपटाचे ट्रेलर आणि टीझर पाहिल्यावर तुम्हाला नक्कीचं कल्पना येईल की यात हास्याकल्लोळचा चांगलाच भरणा करण्यात आला आहे.

आर माधवन- कंगना चित्रपटात सर्वांचे लक्ष्य वेधणार यात कोणतीही शंका नसली तर आर माधवनही त्याचा प्रभाव पाडण्यात कुठेही कमी पडलेला नाही.

दिग्गजांची प्रतिक्रिया- प्रिमियर पाहिल्यावर अगदी राजकुमार हिराणीपासून ते इरफान खानपर्यंत सर्वांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

दिग्दर्शक आनंद राय- ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘रांझना’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक आनंद राय अगदी साध्या पण मनोरंजक अशा ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटाने परतलायं.

संगीत- या चित्रपटात सध्याच्या पिढीला आकर्षक करतील अशी गाणी आहेत.

तर मग जाणार की नाही चित्रपट पाहायला?

Story img Loader