डिजिटल युगात सिनेमाची रिळं गेली आणि सिनेमाचा पडदा अत्याधुनिक झाला. याच डिजिटल तंत्राने सध्या गावखेडय़ातील लोकांनाही ‘रील्स’ची ओळख करून दिली आहे. छोटय़ा-मोठय़ा रील्सच्या माध्यमातून काही सांगू पाहणाऱ्या, लोकांचे मनोरंजन करणाऱ्यांची संख्या जशी शहरात आहे तशीच गावातही मोठय़ा प्रमाणावर आहे. या तळागाळातील रील्स करणाऱ्या कलाकारांची गोष्ट ‘रीलस्टार’ या चित्रपटातून लोकांसमोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीसह  हिंदीतही प्रदर्शित झालेल्या ‘अन्य’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॉबिन वर्गिस ही जोडी ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करत आहेत. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. स्मार्ट फोनच्या  आजच्या जमान्यात रील स्टार बनण्यासाठी कोणतंही वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही, पण रील बनवणाऱ्या या कलाकारांचा प्रवासही वाटतो तितका सोपा मुळीच नसतो. ‘रीलस्टार’ बनण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि स्वप्नांमागे धावताना मोजावी लागणारी किंमतच त्यांना खऱ्या अर्थाने ‘रीलस्टार’ बनवतात, असं काहीसं या चित्रपटाचं कथानक आहे. या चित्रपटात भूषण मंजुळे यांच्यासह ऊर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्निल राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेंद्र पाटील, कल्पना राणे आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत.