‘गुम है किसी के प्यार में’ ही मालका सध्या चांगलीत चर्चेत आली आहे. खास करून नुकत्यात आलेल्या या मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे शोची उत्सुकता वाढली आहे. या प्रोमोमध्ये लिविंग लिजेंड रेखा यांना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विषेश म्हणजे या मालिकेच्या काही भांगांमध्ये रेखा यांची खास हजेरी पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “रेखाजींची दुसऱ्या प्रोमोच्या चित्रीकरणानंतर या शो मध्ये एखादी विशेष एण्ट्री देखील असू शकेल. रेखाजींच्या प्रोमोजना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. खरं तर या आधी देखील रेखा यांनी छोट्या पडद्यावर अनेकदा गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. मात्र यासाठी रेखा नेमकं किती मानधन घेत असतील याची कदाचित तुम्ही कल्पना देखील केली नसेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे देखईल वाचा: Birthday Special: टीव्ही रिपोर्टर ते अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

एका वृत्तानुसार रेखा यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या प्रोमोसाठी मोठी फी आकारली आहे. या मालिकेच्या प्रोमोत एका मिनिटाच्या भूमिकेसाठी रेखा यांनी पाच ते सात कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StarPlus (@starplus)

हे देखील वाचा: अनुपम खेर यांचा वर्कआउट पाहून चाहते थक्क, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या प्रोमोमधील रेखा यांचं आरस्पानी सौंदर्य लक्ष वेधून घेणारं आहे. या प्रोमोमध्ये रेखा त्यांच्या आवाजात मालिकेतील सई आणि विराटच्या कथा सांगताना दिसत आहेत. विराट आणि सईला आपल्या प्रेमाची जाणीव होईल का? असे त्या बोलताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत असून त्यांनी कांजीवरम साडी परिधान केली आहे. तसेच त्यांना प्रोमोमध्ये पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

‘गुम है किसी के प्यार में’च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. सई आणि विराटबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. सम्राटच्या एंट्रीने त्यांच्या प्रेम कहाणीला वेग येईल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरलंय.

Story img Loader