बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. रेखा यांनी आतापर्यंत जवळपास ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज रेखा बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्याच्या करिअरच्या सुरुवातीला मात्र त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. १९६९ साली ‘अंजाना सफर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी रेखा यांना एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

रेखा या त्यावेळी बंगाली अभिनेता बिस्वजीत चटर्जी यांच्यासोबत ‘अंजाना सफर’ या चित्रपटाचं शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या केवळ १५ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे को-स्टार असलेल्या बिस्वजीत यांनी त्यांना जबरदस्तीने किस करत त्यांच्याशी गैरवर्तन केलं होतं. चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना जेव्हा दिग्दर्शक राजा नवाथे यांनी अॅक्शन असं म्हटलं तेव्हा बिस्वजीत यांनी रेखा यांना किस करायला सुरूवात केली. ते पुढची ५ मिनिटं किस करत राहिले आणि रेखा यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. एकीकडे रेखा रडत होत्या तर दुसरीकडे कॅमेऱ्याच्या मागे असलेले क्रू मेंबर मात्र आनंदानं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे

आणखी वाचा- Video : ‘सासरे मागे बसलेत आणि सून…’ डान्स व्हिडीओमुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे

रेखा यांनी यासीर उस्मान यांचं लेखन असलेली आपली बायोग्राफी, ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये या धक्कादायक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. यामध्ये लिहिलंय, ”अंजाना सफर’ चित्रपटाचं शूटिंग मुंबईच्या महबूब स्टुडिओमध्ये सुरू होतं. राजा नवाथे या चित्रपटाचे दिग्दर्शक होतं. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलमध्ये राजा आणि बिस्वजीत यांनी एक प्लान केला होता. त्यावेळी रेखा आणि बिस्वजीत यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता आणि याचे डिटेल अगोदर ठरवण्यात आले होते.’

या प्रसंगाबाबत पुढे लिहिलंय, ‘जेव्हा राजा नवाथे यांनी अॅक्शन असं म्हटलं तेव्हा बिस्वजीत यांनी रेखा यांनी मिठीत घेतलं आणि त्यांच्या ओठांवर किस करायला सुरुवात केली. रेखा यांना आपल्यासोबत असं काही घडेल यांची कल्पनाही नव्हती. त्यामुळे त्या स्तब्ध झाल्या. कॅमेरा रोल होत गेला आणि दिग्दर्शकाना कट असं म्हटल्यानंतर बिस्वजित रेखा यांना सोडायला तयार नव्हते. ते तब्बल ५ मिनिटं रेखा यांना किस करत होते आणि युनिटमधील काही लोक शिट्ट्या मारत होते. तर दुसरीकडे रेखा यांना या प्रसंगामुळे रडू कोसळलं होतं.’

आणखी वाचा- “तो माझ्या बाथरुममध्ये…”, ट्रान्सवूमन सायशा शिंदेनं बॉयफ्रेंडबाबत केला धक्कादायक खुलासा

दरम्यान या प्रसंगानंतर बिस्वजीत यांनी ही त्यांची नाही तर दिग्दर्शक राजा नवाथे यांची चूक असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर ही कल्पना देखील त्यांचीच होती असंही त्यांनी सांगितलं होतं. दिग्दर्शकाच्या मते अशाप्रकारे अचानक केलेलं किस त्या कथेची गरज होती असा खुलासा त्यांनी केला होता.

Story img Loader