बॉलीवूड दिवा रेखा यांनी चार दशकांच्या कारकिर्दीमध्ये कधीच कोणत्याही दिगदर्शक आणि निर्मात्याकडे कामाची विचारणा न केल्याचे म्हटले आहे.
५९वर्षीय रेखा यांनी ७० आणि ८०च्या दशकात मिस्टर नटवरलाल, उमराव जान, सिलसिला आणि खुबसूरत या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. रेखा या चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटमध्ये करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवात उपस्थित होत्या. त्यावेळी आपण कधीच भूमिका मागण्यासाठी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडे न गेल्याचे त्यांनी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना सांगितले.
दोन दिवसांच्या या महोत्सवात विद्या बालन, टेरेन्स लुईस, मोहित चौहान, गोविंद निहलानी, हंसल मेहता, दिव्या दत्ता, नीता लुल्ला आणि अलका यागनिक या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

Story img Loader