बॉलिवूड अभिनेत्री रेखा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यातील वाद, रिलेशनशिप यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. विशेषतः त्यांचं लव्ह लाइफ अनेकदा चर्चेत राहिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधांची जेवढी चर्चा झाली त्याहीपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या आणि विनोद मेहरा यांच्या अफेअरची. एवढंच नाही तर या दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्याही अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. मात्र विनोद मेहरा यांच्या आईला रेखा या अजिबात पसंत नव्हत्या. याचा एक किस्सा रेखा यांनी एका मुलखतीत शेअर केला होता.

रेखा आणि विनोद मेहरा यांच्या अफेअरच्या एकेकाळी बी-टाऊनमध्ये जोरदार सुरू होत्या. एवढंच नाही तर जेव्हा मीडियाच्या प्रश्नाची उत्तरं देताना रेखा यांना समस्या येत असतं तेव्हा विनोद मेहरा त्यांच्या मदतीसाठी धावून येत असत. रेखा यांच्याबाबत विनोद मेहरा खूपच गंभीर होते. रेखा यांच्याशी त्यांना लग्न करायचं होतं पण त्यांच्या आईला सूनेच्या रुपात रेखा अजिबात आवडत नव्हत्या. यासाठी कारणीभूत होतं, रेखा यांचं एका मुलाखतीतील लग्नाआधी मुलींनी शरीर संबंध ठेवण्याबाबतचं वक्तव्य.

आणखी वाचा- “मला वेड्या कुत्र्याने…” गर्लफ्रेंड अलियाशी लग्न करण्याच्या प्रश्नावर रणबीरची प्रतिक्रिया चर्चेत

रेखा यांनी एका मुलाखतीत, लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्याबाबत आणि आई होण्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. जे विनोद मेहरा यांच्या आईला अजिबात आवडलं नव्हतं. एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं खूपच सामान्य गोष्ट आहे. जे लोक पाखंडी आहेत ते म्हणतात की स्त्रीने लग्न होईपर्यंत कोणत्याही पुरुषाशी शरीरसंबंध ठेवू नये. पण हे सर्व चुकीचं आहे. मी याच्याशी सहमत नाही.’ रेखा यांचं हे वक्तव्य त्यावेळी बरंच चर्चेत आलं होतं.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रश्मिकासोबतचा फोटो, नेटकऱ्यांनी शोधली मोठी चूक

रेखा यांनी १९७३ साली दिलेल्या एका मुलाखतीत विनोद मेहरा यांच्या आईबद्दल काही खुलासे केले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘त्यांच्या आईसाठी मी फक्त एक अभिनेत्री नाही तर एक बदनाम अभिनेत्री होते. जिचा भूतकाळ अतिशय वाईट आहे. मी शरीरसंबंधांसाठी वेडी आहे अशी माझी प्रतिमा त्यांच्या मनात आहे. मी त्यांनी सुरुवातीला केवळ विनोदसाठी सर्व सहन केलं मात्र आता त्या असं करणार नाही.’ दरम्यान असंही म्हटलं जातं की रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईचं मन जिंकण्याचा बराच प्रयत्न केला होता मात्र यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर काही वर्षांनी रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्यातही दुरावा आला.

Story img Loader