विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. ऐश्वर्याचे लाखो चाहते आहेत. तर २०१७ मध्ये ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केले. या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांनी ऐश्वर्याला पत्र लिहित तिचे अभिनंदन करत तिचे कौतुक केले आहे. रेखा आणि ऐश्वर्या यांचे एक वेगळे नाते आहे. ऐश्वर्या रेखा यांना ‘रेखा मॉं’ म्हणून हाक मारते.
रेखा यांनी या पत्रात लिहिले आहे की, “तुझ्यासारखी स्त्री अशा नदीसारखी आहे जी कोणत्याही बनावटी शिवाय पुढे जात राहते. ती आपली ओळख न गमावण्याच्या उद्देशाने तिच्या ध्येयापर्यंत पोहोचते. तुम्ही काय बोललात, काय केले हे लोक विसरले, तरी तुम्ही संपूर्ण आहात हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला कोणाला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही,” असे रेखा त्या पत्रात म्हणाल्या.
आणखी वाचा : KBC 13 : १५ व्या प्रश्नाचे उत्तर देत सविता ठरणार शोच्या दुसऱ्या करोडपती?
आणखी वाचा : समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी
रेखा पुढे त्या पत्रात म्हणाल्या, “बेबी, तू खूप पुढे आली आहेस, या प्रवासात तू अनेक अडथळे पार केले आणि त्यानंतर तू एक उंची गाठली आहेस. तू आता पर्यंत सगळ्या भूमिका अप्रतिमपणे साकारल्या आहेस. तर आराध्याच्या आईची तुझी भूमिका मला सर्वात जास्त आवडते. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यात आनंद राहो, तुझी रेखा मॉं.”