बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक रेखा या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. ‘वेलकम बॅक’मधून त्या पुनरागमन करणार असून, अमिताभ बच्चन त्यांचे जोडीदार असणार आहेत, काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती. शिवाय त्यांचा चर्चित ‘खूबसूरत’ चित्रपटाचाही रिमेक येणार आहे. अनिल कपूरची मुलगी रिया कपूर तो बनवणार आहे. चित्रपटात रेखा यांनी साकारलेली भूमिका सोनम कपूर करणार आहे. इतकेच नाही तरा आता रेखा यांचा १९८८ मध्ये आलेला चित्रपट ‘खून भरी मांग’चा मराठीत रिमेक येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनूप जगदाळे यांनी सांगितले की, ‘खून भरी मांग’ चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरू झाली आहे. यात रेखा यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री कविता राधेश्याम करणार आहे. कवितानेदेखील ट्विटरवर तिच्यावर रेखाचा फार प्रभाव असल्याचे लिहिले आहे. या भूमिकेमुळे ती खूप उत्साहित आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा