अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. या दोघांनी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. तर कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’ सुपर डुपर हिट ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एकत्र दिसले. आता या यशस्वी चित्रपटानंतर ते दोघे पुन्हा एकदा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाले आहेत. ते दोघे ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे.

आणखी वाचा : शूटिंग, शूटिंग आणि फक्त शूटिंग…कार्तिक आर्यनने शेअर केले ‘शेहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो

कियारा आणि कार्तिक हे आज इंडस्ट्रीतील स्क्रीनवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाची नमाह पिचर्स आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट करत आहेत.