Alia Bhatt Ambani Deal : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अनेक चित्रपटांची कायमच चर्चा असते. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तिच्या कंपनीच्या डीलमुळे. आलिया भट्टची कंपनी लहान मुलांचे कपडे तयार करते. आलियाची कंपनी आता मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं समजतं आहे. ३०० ते ३५० कोटींमध्ये हे डील होणार आहे. मुकेश अंबानी ही आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार असल्याचं वृत्त आहे. याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचंही समजतं आहे.

हे पण वाचा- आलिया भट्ट-रणवीर सिंहच्या ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली…

आलिया भट्टची कंपनी एटर्नलिया क्रिएटिव्ह ही ED a Mamma ब्रँड लहान मुलांचे कपडे तयार करते. रिलयान्स ब्रँड्स आता ही कंपनी विकत घेऊन त्यांच्या चिल्ड्रन वेअर कॅटेगरीला आणखी बळकटी देऊ इच्छितात. याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचंही कळतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार Ed-a Mamma कंपनी विकत घेण्यासाठी ३०० ते ३५० कोटींची डील होऊ शकते. इकॉनॉमिक टाइम्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या हेतूने आलियाची कंपनी विकत घेण्याचा निर्णय रिलायन्सने घेतला आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाची कंपनी आणि रिलायन्स यांच्यात सुरु असलेल्या या डीलच्या चर्चेला पुढच्या आठवड्यात अंतिम स्वरुप मिळू शकते. अभिनेत्री आलिया भट्टने Ed-a-Mamma या ब्रँडची सुरुवात २०२० मध्ये केली होती. या ब्रँडअंतर्गत वेगवेगळ्या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मद्वारे कपड्याची विक्री केली जाते. आलिया भट्टची कंपनी नफ्यात आहे.

हे पण वाचा- आता आलिया करणार ॲक्शन सीन; शाहरुख-सलमानच्या स्पाय युनिवर्सीमध्ये अभिनेत्रीची एंट्री

Ed-a-Mamma ब्रँडला सुरु करताना आलिया म्हणाली होती की, जागतिक स्तरावर घरगुती ब्रँडची कमतरता पाहून कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. माफक दरामध्ये मुलांची कपडे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. Ed-a-Mamma ब्रँडचे कपडे विविध संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. फर्स्टक्राई, Ajio, Myntra, Amazon, Tata CLIQ यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे कपडे उपलब्ध आहेत. आलिया भट्ट हिच्या Ed-a-Mamma या कंपनीची सध्या मार्केट व्हॅल्यू १५० कोटी रुपये आहे. ही कंपनी विकत घेऊन व्यावसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न रिलायन्स करणार आहे.