‘सुन सुन सुन दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है..’ म्हणत नाचणारी अवखळ पण व्यक्तिस्वातंत्र्य जपणारी ‘खूबसूरत’मधली रेखा  आजही लोकांच्या मनात घर करून आहे. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन अनिल कपूरने या चित्रपटाचा रिमेक करण्याचा घाट घातला आहे.रेखाची भूमिका रिमेकमध्ये सोनम कपूरच्या वाटय़ाला आली आहे. पुढच्या वर्षी तिचा ‘भाग मिखा भाग’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होत आहे. यशराजच्या चित्रपटासाठी तिची निवड झाली आहे. या आनंदात ‘खूबसूरत’ भर पडली आहे.  अर्थात चित्रपटाचे काम सुरू करण्यापूर्वी रेखाची भेट घेऊन तिच्याकडून भूमिका समजून घ्यायची सोनमची इच्छा आहे. सौंदर्य आणि बुद्धीचा हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा!   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remake rekha starrer khoobsurat for sonam