संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटामुळे गँगस्टर्स आणि त्यांच्यावरचे चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटात गँगस्टर माया डोळसची कथा दाखवल्यानंतर आता त्याच्या सिक्वलमध्ये मन्या सुर्वे आणि त्या अनुषंगाने दाऊदचा संघर्ष ते दुबईला प्रयाण असा सारा प्रवास या चित्रपटात असणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम मन्या सुर्वेची भूमिका करतो आहे. पण, जॉनच्याही आधी मन्या सुर्वेची भूमिका अमिताभ बच्चन यांनी रंगवली होती. ‘अग्निपथ’ चित्रपटातील विजय दीनानाथ चौहानची व्यक्तिरेखा ही मन्या सुर्वेच्याच आयुष्यावर बेतलेली होती. त्
मुंबईतल्या गँगस्टर टोळ्यांमध्ये त्याकाळी असलेले मन्या सुर्वेचे वर्चस्व निर्माता-दिग्दर्शक यश जोहर यांना प्रभावित करून गेले होते. त्यांनी मन्या सुर्वेची माहिती गोळा केली. आणि ‘अग्निपथ’चे चित्रिकरण सुरू होण्याआधी अमिताभनाही मन्या सुर्वेच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्यास सांगितले होते. मन्या गँगस्टर असला तरी छानछोकी करणारा आणि नेहमी स्टाईलमध्ये वावरणारा माणूस होता, असे यशजींचे म्हणणे होते. त्यामुळे त्याचे हावभाव, बोलणे या सगळ्यांची नक्कल अमिताभने करावी, अशी अपेक्षा यश जोहर यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार अमिताभने मन्याच्या संवादफेकीसह सगळया हालचालींची हुबेहुब नक्क ल केली होती. त्यामुळे विजय दीनानाथ चौहानची संवादफे कीची ती ढब प्रचंड लोकप्रिय झाली. पण, तिकीटबारीवर हा चित्रपट सपशेल आपटला आणि या सगळ्या गोष्टी दबलेल्या राहिल्या. संजय गुप्ताच्या ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा मन्या सुर्वेची कथा चित्रपटातून जिवंत झाली आहे. मन्या सुर्वेच्या भूमिकेच्या निमित्ताने अभिनेता म्हणून माझी नव्याने प्रेक्षकांना ओळख होईल, असे जॉन अब्राहमने म्हटले आहे.
अमिताभचा मन्या सुर्वे आठवतोय..
संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटामुळे गँगस्टर्स आणि त्यांच्यावरचे चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटात गँगस्टर माया डोळसची कथा दाखवल्यानंतर आता त्याच्या सिक्वलमध्ये मन्या सुर्वे आणि त्या अनुषंगाने दाऊदचा संघर्ष ते दुबईला प्रयाण असा सारा प्रवास या चित्रपटात असणार आहे.

First published on: 19-04-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember manya surve of amitabh