रॉक – रॅपच्या या जमान्यात हिंदी चित्रपट सृष्टीत आवाजाच्या दुनियेतील अभिजात देणगी लाभलेल्या मोहम्मद रफी यांची आज ९४ वी जयंती आहे. चांगला माणूस आणि नेहमीच अनेकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या रफीसाहेबांना बॉलिवुडमधून नेहमीच स्मरले जाते. गाण्यांव्यतिरिक्तही कार, खाण्यापिण्याविषयी शौकिन असणाऱ्या मोहम्मद रफींच्या अनेक आठवणींना आज अनेक माध्यमांतून उजाळा देण्यात येत आहे.

रफीसाब नसते तर काय ऐकले असते आपण? भारतीय चित्रपट संगीताचे काय झाले असते? गायकीला पाश्र्वगायनाची दिशा कोणी दिली असती? आणि आपले काय झाले असते? प्रेमात पडल्यावर, विरहात, आनंदात, दु:खात कोणाचा आवाज ऐकला असता? मोहम्मद अजीजम्, शब्बीर, महेंद्र कपूर या गायकांनी काय केले असते? गायकांचे सोडा, राजेंद्रकुमार, जॉय मुखर्जी, मनोजकुमार, भारत भूषण आपल्याला (आज आवडतात तेवढे तरी) आवडले असते का? शम्मीसाहेबांच्या जंगली हालचालींना सुरेल कोणी बनवले असते? देव आनंदच्या मान हलवण्याला अर्थ कोणी दिला असता? दिलीपकुमारच्या सहज सुंदर अभिनयाला न्याय देतील, अशी गाणी कोणी गायली असती? ‘चलो दिलदार चलो’मध्ये लतादीदींबरोबर कोण गायले असते? त्यांनी ‘सुहानी रात ढल चुकी’ कोणासाठी आणि का बनवले असते? ओ.पी. नय्यरांच्या टांग्यात बसून ‘फिर वोही दिल लाया हू’, ‘मांग के साथ तुम्हारा’ कोणी गायले असते? शंकर जयकिशनना ‘याद न जाए बीते दिनों की’ची चाल सुचली असती का? रोशनजींनी ‘बरसात की रात’मध्ये कशी गाणी केली असती? लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या ‘आवाज मै ना दूंगा’ला कोणी आवाज दिला असता?

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

रफीसाहेबांनी सुमारे पाच हजार हिंदी गाणी, त्यात मराठीसह इतर भाषा धरून सगळी मिळून २५ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर गायली आहेत. त्यातील दोन प्रसिद्ध गाणी म्हणजे ‘आज मौसम बडा’ आणि दुसरे म्हणजे ‘वापस’ चित्रपटातले ‘आयी बहारों की शाम’. या जोडीचे अजून एक सुंदर गाणे म्हणजे ‘चल उड जा रे पंछी..’ साधेपणा, सहजता याचं उदाहरण! हीच सहजता रफीसाब भारत भूषणसाठी गायलेत तेव्हा दिसून येते. मग ‘बैजू बावरा’मधल्या बंदिशी, उपशास्त्रीय गाणी असोत किंवा ‘जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात की रात’ असो. ‘मन रे तू काहे ना धीर धरे..’, राजेंद्रकुमार – ‘मेरे मेहेबूब’, ‘याद ना जाए’, मनोजकुमार – ‘रहा गर्दिशोंमें हरदम’, ‘ए वतन..’, जॉय मुखर्जी – ‘बडे मियाँ दीवाने’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, विश्वजीत – ‘पुकारता चला हू मै’, ‘तुम्हारी नजर क्यूं खफा हो गयी’.. आणखी किती तरी.. आपण फक्त गाणी ऐकायची. दिलीपकुमार आणि रफीसाब म्हणजे दृक् -श्राव्य आनंद! ‘टुटे हुवे ख्वाबोने’, ‘मधुबन मे राधिका’. जंपिंग जॅक जितेंद्रसाठी रफीसाबसुद्धा चंचल गायकी वापरतात. उदाहरणार्थ ‘कितना प्यारा वादा’, ‘गोरिया कहा तेरा देस’. धर्मेन्द्र- त्या काळचा सर्वात सुंदर, हँडसम नायक. त्याच्यासाठीची गायकीही तेवढीच सुंदर.. बघा ना.. ‘आपके हसीन रुख पे..’ किंवा लताबरोबरचे ‘ये दिल तुम बिन कही लगता नही’.. पुन्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल!

रफीसाहेबांबरोबर गाजलेली अशीच अजून एक उत्तुंग जोडगोळी म्हणजे शंकर जयकिशन. ‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘मै गाऊँ तुम सो जाओ’. शंकर जयकिशनचेच ‘लिखे जो खत तुझे’.. हे शशी कपूरसाठी. तसेच ‘तुम बिन जाऊँ कहाँ’. एसडी बर्मनसाहेबांबरोबरची ‘खोया खोया चांद’ आणि ‘ऐसे तो ना देखो’ विसरून कशी चालतील? आणि चिरंजीवांबरोबरची ‘चांद मेरा दिल’ आणि ‘मैने पूछा चांद से..’हीसुद्धा. विसरायचा काही चान्सच नाही. आपल्या आणि आपल्या पुढच्या अनेक पिढय़ांना पुरून उरणारा आवाज आहे हा. रफीसाबच म्हणून गेलेत. – ‘तुम मुझे यूं भूला ना पाओगे.’

हे ऐकाच.. : अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन

रफीसाहेबांचा जीवनपट कुठल्याशा कार्यक्रमात जावेद अख्तरसाहेबांनी आपल्यासमोर मांडला आहे. तो कार्यक्रम कुठला होता माहीत नाही, पण हा पाऊण तासांचा व्हिडीयो यू टय़ूबवर उपलब्ध आहे. जीवनपटच नाही, तर त्यांची गायकी, एका रसिकाच्या आणि विश्लेषकाच्या नजरेने जावेदसाहब आपल्यासमोर उलगडून दाखवतात, त्यांच्या गायकीतले बारकावे आपल्याला दाखवून देतात. रफीसाब महान होते हे आपल्याला माहितीच आहे, पण हा व्हिडीयो पाहिल्यावर त्यांच्या महानतेची अजून ठळकपणे जाणीव होते. न चुकता आवर्जून पाहा. तसेच काही वर्षांपूर्वी रफीसाहेबांचा पट्टशिष्य या नात्याने सोनू निगमने ‘अ‍ॅन इव्हनिंग इन लंडन’ या कार्यक्रमाद्वारे आपल्या गुरूला दिमाखात श्रद्धांजली वाहिली आहे. हा कार्यक्रमसुद्धा यू टय़ूबवर आहे. सुमारे ७५ जणांचा सिंफनी ऑर्केस्ट्रा सोबत घेऊन सोनू निगमने गायलेली रफीसाहेबांची गाणी चुकवू नये अशीच आहेत.

Story img Loader