अभिनेत्री रेणुका शहाणे मागचा बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर आहेत. मात्र त्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग असलेल्या रेणुका शहाणे लवकरच झी मराठीवरील एका कार्यक्रमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात त्या एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रसारित झाला. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

‘बँड बाजा वरात’ या झी मराठीवरील आगामी कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना सुरुवाती पासूनच खूप उत्सुकता होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण? हा कार्यक्रम कधी भेटीला येणार? हे आणि असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते आणि नुकतंच एका नवीन प्रोमो सोबत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना मिळाली आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर सांभाळणार असून हा कार्यक्रम १८ मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
Lakshami Niwas
Video: लक्ष्मी सिद्धूला घरी बोलवणार, त्याची व भावनाची भेट होणार का? पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो

आणखी वाचा- ‘डॅन्सची एक लाखाची सुपारी…’ मराठी भाषादिनाच्या पोस्टवरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली

या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वारांना झी मराठीकडून भरघोस आहेर मिळणार आहे. नुकतंच वाहिनीवर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे झी मराठीकडून जबरदस्त आहेर लग्न घरात सप्रेम भेट म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम लग्नघरातील धूम अनुभवण्यासाठी सज्ज झाला आहे तेव्हा प्रेक्षकसुद्धा मनोरंजनाच्या भरघोस आहेरासाठी तयार असतील यात शंकाच नाही.

Story img Loader