अभिनेत्री रेणुका शहाणे या गेल्या बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर आहेत. पण त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. रेणुका शहाणे या लवकरच झी मराठीवरील बँड बाजा वरात कार्यक्रमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात त्या एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणुका शहाणे यांनी खास संवाद साधला.

यावेळी रेणुका शहाणेंनी कार्यक्रमाच्या वेगळेपणाबद्दल सांगितले. याबाबत त्या म्हणाल्या, “हा कार्यक्रम अगदी वेगळ्या स्वरूपाचा आहे. भावी नववधू, नववर आणि त्यांचं कुटुंब हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही काही मजेशीर खेळ खेळणार आहोत. तसंच या कार्यक्रमातून त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाच्या काही गमतीजमती प्रेक्षकांसमोर येतील. असा कार्यक्रम प्रेक्षकांनी या आधी पाहिलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील खूप उत्सुकता दिसत आहे.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

‘तुम्ही बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांना मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहात. त्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत, कार्यक्रमातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हम आपके है कौन? या चित्रपटामुळे मी जगतवहिनी झाली आहे. मी आजपर्यंत जितकं काम केलं त्यासाठी प्रेक्षकांकडून मला आजवर खूप प्रेम मिळालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मी त्यांच्या घरचीच सदस्य वाटते. माझी या कार्यक्रमातील भूमिका पण काहीशी तशीच असणार आहे. माझ्या भूमिकेचा उलगडा कार्यक्रमासोबत प्रेक्षकांना होईल.”

यापुढे त्या म्हणाल्या, या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर मला पाहताना त्यांना खूप छान वाटतंय. तसंच प्रोमोजमधून कार्यक्रमाचा जो दिमाखदारपणा दिसला त्याबद्दल देखील प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या ट्रोलिंगवर लेखिकेचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या “माझे दिवसातील १५ तास…”

लग्नाच्या अवतीभवती हा कार्यक्रम असून त्यात माझी असलेली भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ते जाणून घेण्याची आतुरता आहे. हा प्रोमो शूट करताना आम्ही खूप धमाल केली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पुढील प्रवासासाठी देखील मी तितकीच उत्सुक आहे, असे रेणुका शहाणेंनी सांगितले.

Story img Loader