संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. प्रत्येक भारतीय एकमेकांना शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करत आहे. यामध्येच कलाविश्वातील सेलिब्रिटींनीदेखील चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
आज प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत मराठी कलाविश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो पोस्ट करुन या शुभेच्छा दिल्या आहेत.
T 3794 – 26th January .. Republic Day
Happiness peace prosperity and .. be safe .. be protected pic.twitter.com/EWRLN0OMXJ— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 25, 2021
View this post on Instagram
Pledge to change a life.
Happy Republic Day , pic.twitter.com/tCWVatC2hq— sonu sood (@SonuSood) January 26, 2021
बिग बींनी ट्विट करत, ‘आनंदी, समृद्धी आणि सुरक्षित’ राहण्याचा सल्ला देत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान बदलण्याचा प्रयत्न करु’, असं म्हणत सोनू सूदने चाहत्यांना वचन दिलं आहे. तसंच ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं संविधान जाणून घ्या आणि स्वातंत्र्य कसं मिळालं ते नक्की पाहा’, असं कंगना रणौतने म्हटलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध भावे, प्रार्थना बेहरे या कालाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.