बिग बॉस मराठी या बहुचर्चित रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाद झाली. खरंतर विजेतीपदाची प्रमुख दावेदार म्हणून रेशमकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे अंतिम टप्प्यावर शो पोहोचल्यावर तिची एक्झिट झाल्याने चाहत्यांना धक्काच बसला. बिग बॉसच्या घरातील जवळपास ९० दिवसांच्या प्रवासात रेशम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहिली. तिच्या आणि राजेश श्रुंगारपुरेच्या मैत्रीवरही बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सर्व गोष्टींवर आता रेशम स्वत: व्यक्त झाली आहे. शोमध्ये राजेशने त्याच्या काही मर्यादा ओलांडल्या, असा सणसणीत आरोपदेखील तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मी चुकले असं म्हणणार नाही कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येक माणसाची एक वेगळी पद्धत असते. राजेशचं लग्न झालं आहे, त्याला दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या मर्यादा माहित असाव्यात किंबहुना आहेत असं म्हणेन मी. पण अशा घटनांमध्ये नेहमी मुलीलाच जबाबदार ठरवलं जातं कारण आपल्या समाजाची वृत्तीच तशी आहे. प्रेक्षकांना केवळ दीड तासाचा शो दाखवला जातो, पण २४ तासांत काय काय घडलं हे त्यांना माहितच नसतं. त्यामुळे मी प्रेक्षकांनाही दोष देणार नाही,’ असं रेशम ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

बिग बॉसच्या घरातील रेशम आणि राजेश यांचा रोमान्स वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याविषयी बोलताना राजेशने त्याच्या मर्यादा ओलांडल्या असा आरोप तिनं केला. ‘माझ्या पत्नीचा माझ्यावर विश्वास आहे असं राजेश म्हणायचा. पण त्याने काही मर्यादा ओलांडल्या. माझ्या प्रियकराला मी कशी आहे आणि माझा स्वभाव कसा आहे हे नीट माहित आहे. त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण झालाच नाही,’ असं ती म्हणाली. बऱ्याच वर्षांनी बिग बॉसमध्ये भेट झाल्याने राजेशसोबतच्या वागण्यात सहजपणा आल्याचंही ती सांगते.

बिग बॉस मराठी अंतिम टप्प्यावर पोहोचला असून आता फक्त सहा स्पर्धक घरात राहिले आहेत. यापैकी एक बाद होणार असून पाच जण अंतिम फेरीत पोहोचतील. तेव्हा पहिल्या बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.