लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील अभिनेता सनीभूषण मुणगेकर एक अनोखा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला आहे. सनीबॅाय एन्टरटेन्मेंटचा सनीभूषणच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टेक ईट इझी उर्वशी’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात नुकताच झाला असून २०२५ मधील १२ महिन्यांमध्ये १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा संकल्प सनीभूषण याने केला आहे.

Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Harbhajan Singh react on dressing room conversation leak
Harbhajan Singh : ‘सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या असतील तर कोचने…’, हरभजन सिंगची संतप्त प्रतिक्रिया
son taimur accompanied saif ali khan to hospital
इब्राहिम नव्हे तर ८ वर्षीय तैमूरने वडिलांना रुग्णालयात नेलं; सैफ अली खानच्या डॉक्टरांची माहिती, म्हणाले…
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
doctors says Saif Ali Khan narrow escape knife missed spine
सैफ अली खानच्या शरीरातून काढलेल्या चाकूचा फोटो आला समोर; हल्ल्यात थोडक्यात बचावला अभिनेता
shraddha kapoor rahul mody twinning
श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंडसह केलं Twinning, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत
raj babbar daughter juhi babbar is anup soni second wife
राज बब्बर यांच्या मुलीने दोन मुलींचा बाबा असलेल्या अभिनेत्याशी केलंय लग्न; आई-वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल जुही म्हणाली…

गतवर्षी पुण्यामध्ये नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर आता मुंबईतही हा प्रयोग ‘टेक ईट इझी उर्वशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला. सनीभूषण दिग्दर्शित, निर्मित आणि अभिनीत ‘टेक इट इझी उर्वशी’ या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. या चित्रपटाचे निर्माते हरेश ठक्कर असून सनीभूषणने निखिल कटारेच्या साथीने दिग्दर्शन केले आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात रंगभूमीवर काम करणाऱ्या नवोदित कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे. श्री शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे कोणताही नवीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतो, पण हे सर्व चित्रपट गुरुवारी प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे. त्यानंतर नियमित प्रयोग होतील.

आणखी वाचा-ब्रिचकँडीच्या रहिवाशांचे ऐकता मग शिवाजी पार्कवाल्यांचे का नाही; शिवाजी पार्कच्या आंदोलनकर्त्यांचा सवाल

‘मी २०२४ मध्ये एकूण १२ मराठी चित्रपट तयार केले आहेत. हे सर्व चित्रपट २०२५ या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. यातील ‘टेक इट इझी उर्वशी’ हा पहिला चित्रपट आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना नाट्यगृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव घेता येईल. यासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून नाट्यगृहासाठी एक नवीन व्यवसाय सुरू होणार आहे. या निमित्ताने चित्रपटाशी निगडीत असलेल्या इतर छोट्या जोडधंद्यांनाही चालना मिळेल. यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हृषिकेश मुखर्जी तसेच सत्यजीत रे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत विषयाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे कुठेही बजेटची अडचण न येता कौटुंबिक मनोरंजक चित्रपट बनवता आले’, असे सनीभूषण मुणगेकर याने सांगितले.

वैविध्यपूर्ण आशयावर आधारित १२ चित्रपट तयार

वैविध्यपूर्ण आशयावर आधारित १२ चित्रपट तयार असून विनोदाच्या निरनिराळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच प्रत्येक चित्रपटात मनोरंजनासह सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. ‘टेक इट इझी उर्वशी’, ‘सोलोमन आयलँड’, ‘वारसदार’, ‘जोडीचा मामला’, ‘अपना टाईम आएगा १’, ‘अपना टाईम आएगा २’, ‘अपना टाईम आएगा ३’, ‘एसएमएस – श्रीरंग मनोहर सूर्यवंशी’, ‘गण्या धाव रे’, ‘आले फंटर’, ‘आले फंटर रिटर्न्स’, ‘आले फंटर अगेन’ हे १२ चित्रपट २०२५ या वर्षातील प्रत्येक महिन्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सर्व चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन सनीभूषणने केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये अन्य कलाकारांसोबतच सनीभूषणने अभिनयही केला आहे. सोमवार ते शुक्रवार नाट्यगृहात नाटकांचे फार प्रयोग होत नाहीत. त्यावेळी नाट्यगृहात प्रेक्षकांना चित्रपट दाखविण्यात येईल.

आणखी वाचा-Shah Rukh Khan’s house recced: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही केली होती रेकी, पोलिसांची माहिती

मराठी चित्रपटांसाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता

वेगवेगळ्या माध्यमातून मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपुढे पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न होत आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे. अभिनेता सनीभूषण मुणगेकर याने त्यासाठी उचलेले पाऊल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. मराठी चित्रपटांसाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे. -विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेते

Story img Loader