मि.परफेक्टशनिस्ट आमिरच्या चाहत्यांना काही तोड नाही याचा अनुभव त्याच्या तांत्रिक टीमला नुकताच आला.
तर झाले असे की, आमिरने गेल्या आठवड्यात आपल्या आगामी प्रोजेक्टकरिता नव्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे ट्विट केले होते. आमिरने ट्विट करताच केवळ अर्ध्या तासातचं त्याला ३००० पेक्षाही जास्त मुलींचा प्रतिसाद मिळाला. या प्रत्येक एन्ट्रीमध्ये व्हिडिओ असल्याने त्याचा परिणाम सर्व्हरवर झाला आणि सर्व्हर क्रॅश झाले, असे सूत्रांनी सांगितले. या आगामी प्रोजेक्टचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. तो म्हणाला की, आम्ही संपूर्ण रात्रभर बसून व्हिडिओ डाउनलोड करत होतो. पुन्हा मॅसेजबॉक्सही रिकामी करावा लागत होता. कारण, आमिरच्या चाहत्यांचे प्रतिसाद त्यावर सतत सुरुच होते.
आमिरचे ट्विटः

Story img Loader