आर. बाल्की यांच्या ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन साकारत असलेल्या व्यक्तिमत्वाची झलक या आधीच पाहायला मिळाली असली, तरी चित्रपटातील अन्य कलाकार धनुष आणि अक्षरा हसन यांची झलक पाहाणे बाकी होते. परंतु, स्वत: बिग बीनी या तरुण सह-कलाकारांसोबतचे छायाचित्र टि्वटरवर पोस्ट केले आहे. छायाचित्रात गॉगल घातलेला धनुष काळ्या रंगाच्या कोटात, तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अक्षरा शॉर्ट ड्रेसमध्ये निदर्शनास पडते. या दोन तरूण कलाकारांबरोबर भरगच्च दाढी-मिशी आणि डोळ्यांवर गॉगल परिधान केलेला अमिताभ बच्चन यांचा अवतार छायाचित्रात पाहायला मिळतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारख घोषीत करण्यात आली असून, पुढच्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Story img Loader