बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून आलिया पहिल्यांदाच वेगळ्या ढंगाची व्यक्तिरेखा साकारताना पहायला मिळणार आहे. आलियाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास ही तिच्यासाठी आजवरची सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूमिका असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आलिया साकारत असलेली ही मुलगी उदरनिर्वाहासाठी पंजाबमध्ये स्थलांतरित झाली असून ती रोजंदारीवर काम करताना दाखविण्यात आले आहे. आलियाने यापूर्वीच्या सर्व चित्रपटांमध्ये शहरी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे आलिया पहिल्याच प्रयत्नात ग्रामीण पार्श्वभूमीची व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारू शकेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘देढ इश्किया’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे याच्या आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपटात शाहीद कपूर, आलिया भट्ट आणि करीना कपूर मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

Story img Loader