बॉलीवूड बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान यांच्या चर्चित ‘पीकू’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘पीकू’चा ट्रेलर मात्र यशराजच्या ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे.
#WeWantPikuTrailer हा हॅशटॅग सध्या ट्विटवर चर्चेत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ म्हणाले की, तुम्हाला ‘पीकू’चा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता लागली आहे. तुमची ही उत्सुकता थोडीशी कमी करत असून, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत आहोत. २५ मार्चला रात्री ९ वाजता ‘पीकू’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल.
शूजीत सरकार दिग्दर्शित ‘पीकू’ वडिल-मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

Story img Loader