अनुराग कश्यपच्या बहुप्रतिक्षित ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्का शर्मा ही जॅझ गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तिचा ‘जॅझ’ लूक प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटातील रणबीरचा फाइटर लूक प्रदर्शित झाल्यानंतर या सुंदर अभिनेत्रीने ट्विटरद्वारे ७०च्या दशकातील लूकमधील आपले छायाचित्र पोस्ट केले आहे. अनुष्काने ‘बॉम्बे वेल्वेट क्लब’मध्ये गाणा-या आणि जॉनी बलराजच्या (रणबीर कपूर) प्रेयसीची भूमिका साकारली आहे. यात तिचे नाव रोजी असे आहे. यावर्षी मे मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Story img Loader