अलिकडेच झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रसिद्धा करण्यात आले, ज्यात चित्रपटातील प्रमुख कलाकार एका क्रुझ शिपवर पाठमोरे बसलेले दिसतात. त्यांच्या पाठमोऱ्या बसण्याने हे कलाकार नेमके कोण आहेत हे समजत नव्हते. परंतु, या चित्रपटाचा भाग असलेल्या रणवीर सिंगने टि्वटरवर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरबरोबर दिलेल्या संदेशात रणवीर म्हणतो, “प्रिय पिक्चर-प्रेमियो, प्रस्तुत है पी से पी-पी-पोस्टर! पागल परिवार का आपको प्यार-भरा पी-पी-प्रणाम! #DilDhadakneD.” यावेळच्या पोस्टरमध्ये पागल परिवारात नेमके कोण कोण सदस्य आहेत ते दृष्टिस पडतात – अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, शेफाली शहा, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा आणि फरान अख्तर हे क्रुझच्या डेकवर सूर्यस्नान घेत खुर्च्यांवर पहुडलेले दिसतात. युरोपच्या काही भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाचा बराचसा भाग हा क्रुझ शिपवर चित्रीत करण्यात आला. सुट्टीवर असलेल्या एका गोंधळलेल्या पंजाबी कुटुंबाची ही कथा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा