वैविध्यपूर्ण आणि चाकोरीबाहेरच्या भूमिकांसाठी अभिनेत्री कंगना राणावत बॉलीवूडमध्ये ओळखली जाते. ‘तन्नु वेडस् मन्नु’, ‘क्वीन’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाल्यानंतर कंगना आता ‘कट्टी बट्टी’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे.
नुकताच या चित्रपटातील कंगनाचा ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रदर्शित करण्यात आलेल्या छायाचित्रामधील चित्राचा कॅनव्हास आणि आजुबाजूचे रंग पाहता प्रथमदर्शनी कंगना एखादी चित्रकार असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. याशिवाय, कंगनाची चित्रपटातील एकूण वेशभूषाही हटके असल्याचे दिसत आहे. ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात अभिनेता इम्रान खान तिच्यासह मुख्य भूमिका साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार या चित्रपटात कंगना दिल्लीत राहणाऱ्या सधन कुटुंबातील पायल नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. तर, इम्रान खान मॅडी शर्मा नावाच्या तरूणाची भूमिका साकारत आहे. कट्टी बट्टी हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा