दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी ‘बॉम्बे व्हेल्वेट’ चित्रपटातील पात्रांविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनुराग कश्यपचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांचा लूक याविषयी चित्रपट रसिकांना प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बॉम्बे व्हेल्वेट’मधील रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला . रणबीर आणि अनुष्का यांच्याव्यतिरिक्त चित्रपटातील आणखी एक आकर्षण म्हणजे करण जोहर ‘बॉम्बे व्हेल्व्हेट’ चित्रपटात साकारत असलेली खलनायकाची भूमिका. आतापर्यंत निर्माता-दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसलेल्या करणने या चित्रपटात कैझाद खंबाटा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. इतरवेळेस चित्रपटाच्या सेटवर असताना मजेशीर आणि विनोदी स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या करणने ‘बॉम्बे व्हेल्वेट’मध्ये मुळ स्वभावाला छेद देणारी भूमिका साकारून त्याच्या चित्रपट कारकीर्दीतील एक अनोखा प्रयोग केला आहे. करण जोहरने सोमवारी ट्विटरवरून कैझाद खंबाटाची काही छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. या छायाचित्रांवरून ही व्यक्तिरेखा अर्थपूर्ण आणि आश्वासक असल्याचा अंदाज बांधता येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा