अरबाज खानची निर्मिती असलेल्या ‘डॉली की डोली’ चित्रपटाचा मोशम पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण, यात बॉलीवूड दिवा सोनम कपूरची झलक पाहावयास मिळत नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबत आणखीनचं उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये असेल.
मोशन पोस्टरमध्ये तीन पुरुषांचे हात दाखविण्यात आहेत. त्यांच्या हातावर डॉलीच्या नावाचे टॅटू काढलेले आहेत. सोनमने ट्विटरद्वारे या मोशन पोस्टरची प्रसिद्धी केली आहे. बॉलीवूडमध्ये या चित्रपटाने पदार्पण करणा-या अभिषेक डोग्राने याचे दिग्दर्शन केले असून ‘फुकरे’ चित्रपटातील अभिनेता पुलकित सम्राट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव यांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटात सैफ अली खान पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार असून मलायका अरोराचे यात खास गाणे आहे.
आणखी वाचा