सोमवारी निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी इटलीत काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला. यावेळी राणी मुखर्जीचा पोशाख खास डिझाईन करून घेण्यात आला होता. प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची याने राणी मुखर्जीच्या लग्नासाठी खास लेहंगा डिझाईन केला होता. यापूर्वीसुद्धा मोजक्या वेळी राणीने सब्यसाची याने डिझाईन केलेल्या पेहरावांमध्ये दिसून आली होती. ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन यांच्यासारख्या काही मोजक्या लोकांसाठी पेहराव डिझाईन करण्यासाठी सब्यसाची इंडस्ट्रीत ओळखला जातो. आपल्या या विवाहाचा उल्लेख राणी मुखर्जीने परीकथा असाच केला आहे. परीकथांवर माझा नेहमीच विश्वास होता. आज या विवाहामुळे माझे आयुष्य हे अगदी त्या परीकथेप्रमाणेच झाले आहे. मी माझ्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या पर्वाचा शुभारंभ करते आहे.. ही परीकथा अशीच पुढे रंगत राहील.. असा विश्वासही तिने व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2014 रोजी प्रकाशित
राणीच्या लग्नातील वधुपोशाखाचे डिझाईन सब्यसाचीचे
सोमवारी निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी इटलीत काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-04-2014 at 05:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealed rani mukerji wore sabyasachi lehenga for wedding