संजय लीला भन्सालीचे दिग्दर्शन असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’च्या दिग्दर्शनास सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील भूमिकांकरिता रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्या लूकमध्ये भूमिकांप्रमाणे आवश्यक बदलही करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने चित्रपटातील आपली लूकचे छायाचित्र ट्विट केले होते. आता रणवीर सिंगचा लूकदेखील वायरल झाला आहे.
ranveer-bald
चित्रपटात बाजीराव पेशवाची भूमिका साकारणा-या रणवीरने भूमकेकरिता केशवपन केले आहे. यासाठी उत्साहित असलेल्या रणवीरने आपण केशवपन करणार असल्याचे ट्विट केले होते.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हैदर’ चित्रपटाकरिता शाहिदनेही केशवपन केले होते. त्याच्या या लूकला समीक्षक आणि प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता रणवीरच्या या लूकला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे राहिल. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader