साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटात तिहेरी भूमिका साकारणा-या सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांच्यावर हे मोशन पोस्टर तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात तिघांच्याही तिहेरी भूमिका असल्यामुळे यात नऊवेळा आनंद लुटता येण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. पण, या पोस्टरमध्ये बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि इषा गुप्ता या तिनही मुख्य अभिनेत्रींची साधी झलकही दाखविण्यात आलेली नाही. फ़ॉक्स स्टुडिओ, वाशू भगनानी यांच्या पूजा एन्टरटेन्मेंटची संयुकत निर्मिती असलेला ‘हमशकल्स’ २० जूनला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
पाहाः ‘हमशकल्स’चा मोशन पोस्टर
साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल्स' चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

First published on: 24-03-2014 at 10:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealed saif ali khan bipasha basus humshakalas motion poster