साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल्स’ चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटात तिहेरी भूमिका साकारणा-या सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांच्यावर हे मोशन पोस्टर तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात तिघांच्याही तिहेरी भूमिका असल्यामुळे यात नऊवेळा आनंद लुटता येण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. पण, या पोस्टरमध्ये बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि इषा गुप्ता या तिनही मुख्य अभिनेत्रींची साधी झलकही दाखविण्यात आलेली नाही. फ़ॉक्स स्टुडिओ, वाशू भगनानी यांच्या पूजा एन्टरटेन्मेंटची संयुकत निर्मिती असलेला ‘हमशकल्स’ २० जूनला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा