बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यास सज्ज झाला आहे. शेक्सपिअरच्या ‘हेम्लेट’वर आधारित असलेल्या विशाल भारद्वाजच्या आगामी ‘हैदर’ चित्रपटात शाहीद पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. रोमॅण्टिक चित्रपटांनी आपल्या करियरची सुरुवात करणा-या शाहिदने ट्विटद्वारे चित्रपटाचा फर्स्ट लूक आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कमिने’ चित्रपटात गुड बॉयवरून बॅड बॉयच्या इमेजमध्ये दिसलेल्या शाहीदने सर्वांनाच पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का दिला होता. ‘हैदर’साठी तर त्याने केशवपनही केले. त्यामुळे चित्रपटातील त्याच्या लूकबद्दल चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. ‘आर. राजकुमार’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या आधीच्या चित्रपटांमध्ये दिसलेला त्याचा अॅक्शन आणि रोमिओ या अवतारांपेक्षा अगदी वेगळा लूकमधला शाहीद ‘हैदर’च्या फर्स्ट लूकमध्ये दिसतो.
हॅम्लेटलर आधारित असलेल्या या चित्रपटात ‘एक व्हिलन’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहीद आणि श्रद्धामधील केमिस्ट्री दिसते. ‘हैदर’चे चित्रीकरण काश्मिरमध्ये करण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला चित्रीकरणावेळी वारंवार स्थानिक नागरिकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा