‘नीरजा’ या आगामी चरित्रपटात सोनम कपूर उड्डाणसेविका नीरजा भानोत यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील आपल्या लूकचे स्निक पिक सोनमने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. नीरजा भानोत या शूर उड्डाणसेविका होत्या. त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

५ सप्टेंबर १९८६ ला मुंबईहून उड्डाण केलेल्या ‘पॅन अ‍ॅम फ्लाइट ७३’ या विमानाचे अपहरण करून ते कराचीत उतरवण्यात आले होते. नीरजा भानोत ही २३ वर्षांची तरुणी त्या विमानात वरिष्ठ उड्डाणसेविका म्हणून काम करत होती. त्या प्रसंगाला तोंड देणाऱ्या नीरजाला प्रवाशांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवावा लागला होता. नीरजाची ही शौर्यकथा रुपेरी पडद्यावर येणार असून प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक राम मधवानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नीरजा भानोत यांची वास्तव कथा मांडणाऱ्या ‘नीरजा’ या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ करणार आहे.

Story img Loader