बॉलिवूडमधील बहुचर्चित लग्नसोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि दिल्लीस्थित आयुष शर्मा १८ नोव्हेंबर रोजी हैद्राबात येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. या भव्य लग्नसोहळ्याच्या बातम्या आणि लग्नाला उपस्थित राहाणऱ्या पाहुण्यांची नावे सातत्याने माध्यमातून झळकत आहेत. लग्नसोहळ्यास उपस्थित राहाणाऱ्यांच्या नावांमध्ये पंतप्रधान नरेंन्द्र मोदींपासून शाहरूख खानपर्यंतच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय अनेक नामवंत व्यक्तिंच्या नावांची भर यात पडत आहे. सलमान खान आणि शाहरूख खानच्या संबंधात कटूता आसल्याच्या पार्श्वभूमिवर शाहरूख खानच्या नावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीबाबत भारतीय जनता पक्षाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पंतप्रधानांना आपला भरगच्च कार्यक्रम पाहून लग्नसोहळ्याच्या उपस्थितीबाबत ठरवावे लागेल. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दादेखील आहे. अनेक प्रवेशद्वार असलेल्या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी सुपरस्टार सलमान खानच्या असण्याने प्रचंड गर्दी होऊन, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त करीत, सुत्रांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीबाबत शंका व्यक्त केली आहे. जेष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा या लग्नाला उपस्थित राहाणार असले, तरी आपण पंतप्रधानांचे अथवा पक्षाचे प्रवक्ते नसल्याचे म्हणत पंतप्रधानांच्या उपस्थितीबाबत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. असे असले तरी, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना पंतप्रधानांविषयी जिव्हाळा असल्याने वेळातवेळ काढून पंतप्रधान मोदी या लग्नास उपस्थित राहिल्यास आपल्याला आनंदच होईल अशी भावना शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली. शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या उपस्थितीबाबत निश्चिती दिली नसली, तरी २१ नोव्हेबर रोजी पार पडणाऱ्या स्वागत समारंभाला शाहरूख खान उपस्थित राहाणार असल्याचे समजते. याविषयी बोलताना शाहरूख म्हणाला, अर्पिता माझ्या बहिणीसारखी आहे. ती लहान असल्यापासून मी तिला ओळखतो. नक्कीच मी तिच्या लग्नाला उपस्थित राहीन. यासाठी मला कोणत्याही आमंत्रणाची अवश्यकता नाही. बऱ्याच काळापासून घरापासून दूर असल्याने लग्नाचे आमंत्रण आले आहे अथवा नाही हे मला अद्याप माहीत नाही. परंतु, संबंध असे आहेत की मला आमंत्रणाची गरज नाही. कतरिना कैफ, आमीर खान आणि किरण राव, करण जोहर, साजिद नाडियादवाला आणि कुटुंबिय, डेव्हिड धवन, त्याची पत्नी आणि मुल वरुण व रोहित धवन, हेमा मालिनी आणि धर्मेन्द्र, चिरंजीवी आणि मुलगा रामचरण इत्यादी मंडळी लग्नास उपस्थित राहाणार असल्याचे समजते.
(सौजन्य – बॉलिवूड हंगामा)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा