यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला निमंत्रित करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका येत्या १६मे पासून सुरूवात होणाऱ्या कान्स महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहे. ६७व्या कान्स महोत्सव सोहळ्यात मल्लिका शेरावत हिच्या हस्ते सीआयआय पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबद्दल ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना मल्लिकाने उद्घाटन सोहळ्याची प्रमुख अतिथी म्हणून बोलावणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. ‘मर्डर’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली मल्लिका काही काळापासून चित्रपटांपासून लांब राहिली आहे. मात्र, आता कान्स चित्रपट सोहळ्याचे निमंत्रण मल्लिकासाठी चित्रपटसृष्टीतील पुनरागमनाचे तिकिट ठरू शकते. यावेळी बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मल्लिकाचे पेहराव नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्यामुळे येणाऱया कान्स महोत्सवात मल्लिका नक्की कोणत्या वेषात कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र, मल्लिकाने कान्ससाठी परिधान करणार असलेल्या आपल्या पेहरावाची डिझाईन्स चाहत्यांसाठी प्रसिद्ध केली आहेत. कान्स महोत्सवासाठी मल्लिकाच्या पेहरावाचे डिझाईन करण्याची जबाबदारी पेललेयं ती डिझायनर मनिष त्रिपाठीने.

कान्सच्या निमंत्रणामुळे मल्लिका शेरावत सध्या आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आहे. कान्स चित्रपट महोत्सव हा अत्यंत मानाचा चित्रपट महोत्सवांमध्ये कान्स चित्रपट महोत्सवाची गणना होत असून यापूर्वी बॉलिवूडमधील ऐश्वर्य़ा राय- बच्चन, सोनमा कपूर यांसारख्या तारकांनी हजेरी लावली होती.

नुकतेच ‘हवाई’ या अमेरिकन टिव्ही शोच्या मालिकेत मल्लिका शेरवात दिसली होती. कान्समध्ये मल्लिका दुसऱ्यांदा उपस्थित राहणार असून यापूर्वी सन २००० मध्ये जॅकी चेनबरोबरच्या ‘मिथ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धासाठी मल्लिकाने कान्सला हजेरी लावली होती. यावेळी अंगप्रदर्शन केल्याच्या कारणावरून अनेक जणांनी मल्लिकावर टीका केली होती.

त्यानंतर सन २०१०  टीकेची दखल घेत मल्लिकाने हिस या चित्रपटाच्या प्रसिद्दीसाठी येताना कान्स महोत्सवात सोनेरी रंगाचा कट-आऊट गाऊन परिधान केला होता.


त्याचवर्षी ‘वॉल स्ट्रीट: मनी नेव्हर स्लीप्स’ या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी मल्लिकाने पुन्हा एकदा बोल्ड पद्धतीने पेहराव केला होता.

मल्लिका शेरावतने २०१२मध्ये कान्स महोत्सवातील बोल्ड पेहराव सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता.

त्यानंतर २०१३मध्ये मात्र, आपल्या आजवरच्या बोल्ड प्रतिमेला छेद देणारे पोशाख मल्लिकाने सातत्याने परिधान केले.

Story img Loader